इंग्लंडविरुद्धची दुसरी टी-20 आज
नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर आज भारत आणि इंग्लंड यांच्यात दुसरी टी-20 रंगणार आहे. पहिल्या टी-20मध्ये पराभूत झाल्यानंतर मालिकेत आव्हान टिकवून ठेवण्यासाठी भारताला आजचा सामना जिंकणे गरजेचे आहे.
नागपूर : नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर आज भारत आणि इंग्लंड यांच्यात दुसरी टी-20 रंगणार आहे. पहिल्या टी-20मध्ये पराभूत झाल्यानंतर मालिकेत आव्हान टिकवून ठेवण्यासाठी भारताला आजचा सामना जिंकणे गरजेचे आहे.
इंग्लिश पाहुण्यांनी टी-20 मालिकेची सुरुवात धमाकेदार विजयाने केलीये. त्यामुळे हीच विजयी मालिका कायम ठेवण्याचा प्रयत्न इंग्लंडचा संघ करेल. पहिल्या टी-20मध्ये भारताच्या फलंदाजांना मोठया फटक्यांचा नाद चांगलाच महागात पडला.
यामुळे भारताला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. विराट कोहलीने सलामीला येताना थोडाफार खेळ करण्याचा प्रयत्न केला मात्र तो पुरेसा ठरला नाही. त्यामुळे या सामन्यात भारताच्या सलामीच्या जोडीवर मोठी भिस्त असेल. त्यांनी चांगली सुरुवात करुन दिल्यास भारताला मोठी धावसंख्या उभारण्यास मदत मिळेल.
सामन्याची वेळ : संध्याकाळी सात वाजता