कोलकाता : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील मोस्ट अवेटेड मॅच ईडन गार्डन्सवर रंगणार आहे. या मॅचसाठी क्रिकेटप्रेमींमध्ये मोठी उत्सुकता आहे. हे क्रिकेट युद्धच असणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, तिकीट खिडीकवर चाहत्यांनी मोठी गर्दी केली आहे. मात्र, त्यांना रिकाम्या हातानं परताव लागतंय. सामान्यांसाठी फार थोडी तिकीटं कॅबनं उपलब्ध केल्यानं चाहत्यांमध्ये कमालीची नाराजी आहे.


 


भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लढतींना एखाद्या युद्धासारखं स्वरुप येतं. क्रिकेटपटूंबरोबरच दोन्ही देशांच्या क्रिकेटप्रेमींच्या भावनाही यामध्ये जोडल्या जातात. त्यामुळे या मुकाबल्यात दोन्ही देशांच्या चाहत्यांमधील द्वंद्वंही आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरेल.


 


भारत आणि पाकिस्तान क्रिकेट जगतातील दोन पारंपरिक प्रतिस्पर्धी. जगाच्या पाठीवर कुठेही मॅच असो. दोन्ही देशांचे चाहते आपापल्या टीमला सपोर्ट करायला मैदानावर हजर असतात... वर्ल्ड कपमध्ये तर दोन्ही देशांच्या पाठीराख्यांचा उत्साह हा बघण्यासारखा असतो.


वर्ल्ड कप जिंकला नाही तरी चालेल पण भारतानं पाकिस्तानला आणि पाकिस्ताननं भारताला पराभूत करावं हीच ईच्छा या चाहत्यांची असते. आतातर टी-२० वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये महायुद्ध रंगणार आहे. त्यातच कोलकात्याच्या ईडन गार्डन्स ही मॅच रंगणार आहे. त्यामुळे क्रिकेटच्या मैदानावर चाहत्यांमध्ये कमालीचा उत्साह असेल.


भारत-पाकिस्तान मुकाबल्यात प्रत्येक बॉल गणिक मॅचची रंगत वाढत जाते. कधी पारडं  भारताच्या तर कधी पाकिस्तानच्या बाजूनं झुकतं. तसतसे या चाहत्यांचे चेह-यावरील भावही बदलताना दिसतात... टी-२० वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया पाकिस्तानपेक्षा वरचढ ठरली आहे. त्यामुळे या मॅचमध्ये जिंकण्यासाठी धोनीची टीम हॉट फेव्हरिट आहे. भारतात मॅच असल्यानं मॅच पाहण्यासाठी भारतीय चाहते मोठ्या संख्येनं क्रिकेटच्या मैदानावर उपस्थित असतील...सो बी रेडी फॉर ..... मदर ऑफ ऑल क्रिकेटिंग बॅटल...