बँकॉक : आशिया कप टी-20 स्पर्धेतच्या अंतिम सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघाने पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा धुव्वा उडवलाय. अंतिम सामन्यात भारताने पाकला 17 धावांनी धूळ चारत आशिया कपची ट्रॉफी जिंकलीये. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिताली राजच्या नाबाद 73 धावा आणि एकता बिश्त, झुलन गोस्वामी, अनुजा पाटील यांनी केलेल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारताने पाकिस्तानचा पराभव केला. 


भारतीय महिला संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 5 बाद 121 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल पाकिस्तानला 20 षटकांत केवळ 104 धावा करता आल्या. एकता बिश्त हिने दोन विकेट घेतल्या तर भारताच्या इतर महिला गोलंदांजांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.