फ्लोरिडा : अमेरिकेत सध्या क्रिकेचा फिव्हर चढलाय. भारत आणि वेस्ट इंडिज दरम्यान आज अमेरिकेत पहिला ट्वेन्टी-ट्वेन्टी सामना होतोय. विशेष म्हणजे या सामन्यासाठी अमेरिकेतील फ्लोरिडामध्ये प्रथमच क्रिकेटचं ग्राऊंड उभारण्यात आलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमेरिकेत क्रिकेटचं व्यासपीठ निर्माण होण्याच्या इराद्यानं इथं दरवर्षी असे सामने खेळवण्याचा मानस आहे. त्यातला पहिला सामना आज होतोय. अमेरिकेच्या सेंट्रल ब्रोवर्ड रिजनल पार्क मैदानावर हा सामना रंगणार आहे.. 


डिसेंबर 2014मध्ये कसोटी क्रिकेटमधून निवृत्त झालेल्या धोनीला चालू वर्षात फक्त सातच सामने खेळायचे आहेत. त्यापैकी दोन वेस्ट इंडिजविरुद्ध आहे, तर त्यानंतर भारतात न्यूझीलंडविरुद्ध पाच सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळायची आहे.


विशेष म्हणजे अमेरिकेत खेळल्या जाणा-या या सामन्यामध्ये धोनीसोबत प्रशिक्षक अनिल कुंबळे यांचीही ही पहिलीच मोहीम आहे.


 सामन्याची वेळ : संध्याकाळी 7.30 वाजता