अँटिगा : अँटिगाच्या सर विवियन रिचर्ड्स स्टेडियमवर भारत विरुद्ध वेस्ट इंडिजमध्ये पहिली टेस्ट मॅच सुरु होतेय. 14 वर्षांपासून टेस्ट सीरिजमध्ये घरच्या मैदानावर कॅरेबियन टीम भारतीय टीमला पराभूत करु शकलेली नाही. त्यामुळे कोहली अँड कंपनीचं या मॅचमध्ये हॉट फेव्हरिट असेल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टेस्ट रँकिंगमध्ये अव्वल स्थानी विराजमान होण्यासाठी कोहलीच्या टीमला कॅरेबियन टीमला परास्त करणं आवश्यक आहे. अनिल कुंबळेच्या मार्गदर्शनाखाली हा पहिलाच दौरा आहे. त्यामुळे कुंबळे भारतीय टीमला विजय मिळवून देण्यासाठी आतुर असेल. 


विंडीज टीम शॉर्टर फॉरमॅटमध्ये चांगली कामगिरी करतेय. मात्र, टेस्टमध्ये त्यांना याची पुनरावृत्ती करता आलेली नाही. श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियाकडून कॅरेबियन टीमला सपाटून मार खावा लागला होता. आता जेसन होल्डरच्या टीमलाटीम  इंडियावर मात करण्यासाठी कमालीचे कष्ट करावे लागणार आहेत. तर कोहलीच्या टीमसाठी बॅट्समनची कामगिरी निर्णायक ठरेल. संयमी बॅटिंग करण्याचं आव्हान आता भारतीय बॅट्समनसमोर असेल. 


सामन्याची वेळ - सायंकाळी साडेसात वाजल्यापासून