मुंबई : पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलियासारख्या बड्या टीम्सना मात दिल्यावर टीम इंडिया आता वेस्ट इंडिजशी भिडणार आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर टीम इंडिया आणि वेस्ट इंडिजमध्ये सेमी फायनल रंगणार आहे. विंडिजसारख्या टीमवर टीम इंडिया मात करुन फायनल गाठेल असा विश्वात भारतीय क्रिकेट फॅन्सला वाटतोय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑस्ट्रेलियासारख्या तगड्या प्रतिस्पर्ध्यावर रोमहर्षक विजय मिळवला आणि आता वर्ल्ड कप भारताचाच अशी आशा भारतीय क्रिकेट फॅन्समध्ये निर्माण झाली. आता सेमी फायनलमध्ये टीम इंडियाचा मुकाबला वेस्ट इंडिजशी रंगणार आहे. यामुळे क्रिकेट फॅन्सला ख्रिस गेल विरुद्ध विराट कोहली हा सामनाही पाहायला मिळण्याची शक्यता आहे. 


टीम इंडियाची वर्ल्ड कप अभियानाची सुरुवात पराभवानं झाली मात्र त्यानंतर पाकिस्तान, बांग्लादेश आणि ऑस्ट्रेलियाला पराभूत करत टीम इंडियानं सेमी फायनलमध्ये धडक मारली. तर दुसरीकडे वेस्ट इंडिजनं आपल्या गटात इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका या मोठ्या टीम्सना धुळ चारत सेमी फायनलमध्ये प्रवेश केला. मात्र अफगाणिस्तानविरुद्ध त्यांना धक्कादायक पराभवाला सामोर जावं लागलय. टीम इंडियाच्या सर्वाधिक आशा या कोहलीवर केंद्री झाल्या आहेत. शिखर आणि रोहितला अद्यापपर्यंत चांगली ओपनिंग देता आलेली नाही. सुरेश रैनाच्या बॅट्समधून रन्स निघत नाहीयेत. तर युवी दुखापतग्रस्त असल्यानं त्याचं टीममधील स्थानच धोक्यात आलय. 


प्रमुख टार्गेट असेल ख्रिस गेल


धोनी फिनिशरची आणि कॅप्टन्सची भूमिका योग्य पार पाडतोय. तर बॉलिंगमध्ये नेहराच्या जोडीला हार्दिक पंड्या आणि जसप्रित बुमराह चांगली कामिगिरी करताहेत. आता सेमी फायनलमध्ये टीम इंडियाचं प्रमुख टार्गेट असेल ते ख्रिस गेल.गेलला लवकरात लवकर आऊट करावं लागेल अन्यथा तो जर क्लिक झाला तर मग गेलच्या वादळात धोनी एँड कंपनीचा निभाव लागणं कठिण होईन बसेल. दुसरीकडे विंडिजच्याही बहुतांश आशा या गेलभोवतीच एकवटलेल्या असतील.


मिडल ऑर्डरला आंद्रे फ्लेचरनही आतापर्यंत चांगली कामगिरी केलीय. ड्वेन ब्राव्हो, आंद्रे रसेर हे दोन ऑल राऊंडर्स तर सॅम्यूएल बद्री आणि सुलेमान बेन हे दोन स्पिनर्स त्यांच्या ताफ्यात आहेत. त्यांचा कॅप्टन डॅरेन सॅमी काही फॉर्मत दिसत नाहीय. टीम इंडियानं ऑक्टोबर २०१५मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध या पिचवर मॅच खेळली होती. तेव्हा आफ्रिकेनं रन्सचा पाऊन पाडला होता.


आता या लढतीत पिच कसं असेल आणि कोणती टीम रन्सचा पाऊस पाडते हे पाहणदेखील औत्सुक्याचं ठरणार आहे. आता धोनी एँड कंपनीनं वानखेडेवरदेखील विजय साकारात फायनल गाठतील असाच विश्वास भारतीय क्रिकेट फॅन्सला वाटतोय.