बंगळूरु : पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला पराभव स्वीकारावा लागला असला तरी बंगळूरुमधील दुसऱ्या कसोटीत भारतीय संघ जोमाने पुनरागमन करेल असा विश्वास ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेविड वॉर्नरने व्यक्त केलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारताला तब्बल ३३३ धावांनी मानहानीकारक पराभवास सामोरे जावे लागले. मात्र असे असले तरी भारत दमदार पुनरागमन करेल असे वॉर्नरने म्हटलेय. भारत कसोटीमध्ये नंबर वन टीम आहे. त्यांच्याकडे चांगले खेळाडू आहेत, असे तो म्हणाला.


पुण्यात आम्ही भारतीय संघाच्या रणनीती पाहिल्या. गोलंदाजीतील बदल, क्षेत्ररक्षण. पहिल्या सामन्यात जरी आम्ही बाजी मारली तरी दुसऱ्या सामन्यात भारतीय संघ जोरदार पुनरागमन करेल, असे पुढे वॉर्नरने सांगितले. 


४ मार्च ते ८ मार्चदरम्यान बंगळूरुमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताचा दुसरा कसोटी सामना रंगणार आहे.