दुसऱ्या वनडेमध्ये भारताचा विजय, मालिकाही जिंकली
इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये भारताचा 15 रननी विजय झाला आहे.
कटक : इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये भारताचा 15 रननी विजय झाला आहे. या विजयामुळे भारतानं मालिकाही खिशात झाली आहे. 382 रनचा पाठलाग करताना इंग्लंडनं 50 ओव्हरमध्ये 366 रनपर्यंत मजल मारता आली. इंग्लंडचा कॅप्टन ओईन मॉर्गननं शेवटपर्यंत झुंज देत 81 बॉलमध्ये 102 रनची खेळी केली. ओपनर जेसन रॉयनं 82 आणि जो रूटनं 54 रन केल्या.
याआधी टॉस जिंकून इंग्लंडनं पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला. सुरुवातीला इंग्लंडच्या बॉलर्सनी हा निर्णय योग्य ठरवतं भारताची अवस्था 3 बाद 25 अशी केली होती, पण युवराज आणि धोनीनं शतक करून भारताला 381 रनपर्यंत पोहोचवली.
युवराज सिंगनं 127 बॉलमध्ये 150 रन तर धोनीनं 122 बॉलमध्ये 134 रन केल्या. युवराजचं हे वनडे क्रिकेटमधलं 14वं आणि धोनीची दहावं शतक होतं. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक झळकवायला युवराजला तब्बल पाच वर्ष नऊ महिने आणि 30 दिवसांची वाट पाहावी लागली आहे. याधी युवराजनं 2011च्या वर्ल्ड कपमध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या मॅचमध्ये सेंच्युरी झळकावली होती.
भारताचे विजयाचे खास क्षण