बंगळुरू : पुण्यातल्या पहिल्या टेस्टमधल्या दारूण पराभवाचा बदला भारतानं घेतला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये भारताचा ७५ रननी विजय झाला आहे. पुन्हा एकदा आर. अश्विन हा भारताच्या विजयाचा शिल्पकार ठरला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१८८ रन्सचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाला ११२ रनवर गुंडाळण्यात भारतीय बॉलर्सना यश आलं. शेवटच्या इनिंगमध्ये आर. अश्विननं सर्वाधिक सहा विकेट घेतल्या तर उमेश यादवला दोन आणि जडेजा, इशांतला प्रत्येकी एक विकेट मिळाली.


याआधी चौथ्या दिवसाची सुरुवात २१३/४ अशी केल्यानंतर भारताचा डाव गडगडला आणि २७४ रन्सवर ऑल आऊट झाला. लोकेश राहुल, अजिंक्य रहाणेची हाफ सेंच्युरी आणि चेतेश्वर पुजाराच्या झुंजार ९२ रन्समुळे भारताला ऑस्ट्रेलियासमोर सन्मानजक आव्हान ठेवण्यात आलं. दोन्ही इनिंगमध्ये हाफ सेंच्युरी करणाऱ्या के.एल.राहुलला मॅन ऑफ द मॅच देऊन गौरवण्यात आलं. या विजयामुळे भारतानं सीरिजमध्येही कमबॅक केलं आहे.