धरमशाला : न्यूझीलंडविरुद्धची टेस्ट सीरिज 3-0नं खिशात घातल्यानंतर भारताची वनडेमध्येही विजयी घोडदौड सुरुच आहे. धरमशालामध्ये झालेली पहिली वनडे भारतानं 6 विकेटनं जिंकली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टेस्टप्रमाणेच वनडेमध्येही विराट कोहलीनं त्याचा फॉर्म कायम ठेवला आहे. विराटनं 81 बॉलमध्ये नाबाद 85 रनकरून भारताला जिंकवून दिलं. 191 रनचा पाठलाग करताना भारताची सुरुवात चांगली झाली. ओपनर रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणेनं पहिल्या विकेटसाठी 49 रनची पार्टनरशीप केली. भारताचा विजय सोपा वाटत असतानाच रोहित शर्मा 14 रनवर आऊट झाला. यानंतर रहाणे 33, मनिष पांडे 17, धोनी 21 रनवर आऊट झाले तर केदार जाधव 10 रनवर नाबाद राहिला.  


याआधी धोनीनं टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला. भारतीय बॉलर्सनी हा निर्णय योग्य ठरवला आणि न्यूझीलंडला 190 रनमध्ये ऑलआऊट केलं. वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या हार्दिक पांड्यानं सर्वाधिक 3 विकेट घेतल्या. पांड्याबरोबरच अमित मिश्रालाही 3 विकेट घेण्यात यश मिळालं. उमेश यादव आणि केदार जाधवनं प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. हार्दिक पांड्यालाच मॅन ऑफ द मॅच देऊन गौरवण्यात आलं.