हरारे : झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये भारताचा 9 विकेट आणि 45 बॉल राखून दणदणीत विजय झाला आहे. आपली पहिलीच वनडे खेळणाऱ्या के.एल.राहुलनं या मॅचमध्ये नाबाद सेंच्युरी झळकावून भारताचा विजय निश्चित केला. राहुलनं 115 बॉलमध्ये 100 रन केल्या, तर अंबाती रायडूनंही राहुलला चांगली साथ दिली. रायडूनं 120 बॉलमध्ये 62 रन केल्या.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याआधी भारताचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनीनं टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला. झिम्बाब्वेला 49.5 ओव्हरमध्ये फक्त 168 रनचा पल्ला गाठता आला. भारताकडून जसप्रीत बुमराहनं सर्वाधिक 4 विकेट घेतल्या, तर धवल कुलकर्णी आणि बरिंदर सरनला प्रत्येकी दोन विकेट मिळाल्या. अक्सर पटेल आणि युझुवेंद्र चहालला प्रत्येकी एक विकेट घेण्यात यश मिळालं. सेंच्युरी मारणाऱ्या के.एल.राहुलला मॅन ऑफ द मॅचचा किताब देऊन गौरवण्यात आलं.  


या मॅचमध्ये भारताकडून के.एल.राहुल, करुण नायर आणि युझुवेंद्र चहाल यांनी वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केलं.