अहमदाबाद : कबड्डीमध्ये भारत पुन्हा विश्वविजेता झाला आहे. वर्ल्ड कप फायनलमध्ये भारतानं इराणचा 38-29नं पराभव केला आहे. भारताचा कबड्डी वर्ल्ड कपमधला हा सलग तिसरा विजय आहे. यापूर्वीही भारतानं दोन्ही वेळा इराणलाच धूळ चारली होती.