कोलकता टेस्टमध्ये भारतीय बॅट्समन गडगडले
न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टच्या पहिल्या दिवशी भारतीय बॅटिंग चांगलीच गडगडली.
कोलकता : न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टच्या पहिल्या दिवशी भारतीय बॅटिंग चांगलीच गडगडली. या गडगडलेल्या बॅटिंगला चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणेच्या हाफ सेंच्युरीनं सावरायचा प्रयत्न केला. दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारतानं 7 विकेटच्या मोबदल्यात 239 रन केल्या होत्या. वृद्धीमान सहा 14 रनवर तर रवींद्र जडेजा शून्य रनवर खेळत आहे.
भारतानं टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला, पण भारतीय बॅट्समननी कोहलीचा हा निर्णय चुकीचा ठरवला. स्कोअरबोर्डवर एक रन असताना धवन तर 28 रन असताना मुरली विजय आऊट झाला. तर कोहलीही फक्त 9 रनवर आऊट झाला.
यानंतर पुजारा आणि अजिंक्य रहाणेनं भारताचा डाव सावरला. पण दोघांनाही शतकी मजल मारता आली नाही. पुजारा 87 रनवर तर अजिंक्य रहाणे 77 रनवर आऊट झाला. यानंतर आलेला रोहित शर्माही फक्त दोन रनवर आऊट झाला. न्यूझीलंडच्या मॅट हेन्रीनं 3, जीतन पटेलनं 2 आणि ट्रेन्ट बोल्ट, वॅगनरला प्रत्येकी एक विकेट मिळवण्यात यश आलं.