भारतीय बॅट्समनला धोकादायक मानत नाही - केन विलियमसन
न्यूजीलंडचा कर्णधार केन विलियमसनने भारतीय टेस्ट टीमचा कर्णधार विराट कोहलीचं भरभरुन कौतूक केलं
मुंबई : न्यूजीलंडचा कर्णधार केन विलियमसनने भारतीय टेस्ट टीमचा कर्णधार विराट कोहलीचं भरभरुन कौतूक केलं आहे. त्याने म्हटलं की, भारतीय कर्णधाराला खेळतांना पाहून खूप काही शिकलो. क्रिकेटच्या तिन्ही फॉर्मेटमध्ये बॉलर्सवर दबदबा बनवून ठेवण्याचं कौशल्य विराट कोहलीला महान बनवतं.
विलियमसन आणि कोहली यांच्याशिवाय जो रूट आणि स्टीव स्मिथ वर्ल्ड क्रिकेटचे चार सर्वश्रेष्ठ बॅट्समन आहेत. विलियमसनने म्हटलं की, कॅप्टन्सी आणि बॅटींग यांच्यामध्ये संतुलन बनवण्यात कोणतीही अडचण येत नाही. विलियमसन कोणत्याही भारतीय बॅट्समनला तीन टेस्ट सामन्यांच्या सीरीजमध्ये धोकादायक मानत नाही. कानपूरला 22 सप्टेंबरला पहिला टेस्ट सामना रंगणार आहे.