टीम इंडियाच्या खेळाडूंनी घेतली जवानांची भेट
टीम इंडियाच्या क्रिकेटपटूंनी लष्करातील जवानांची भेट घेतली. बीसीसीआय अध्यक्ष अनुराग ठाकूर यांच्याबरोबर रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, केदार जाधव आणि मनिष पांडे हे क्रिकेटपटू यावेळी उपस्थित होते.
नवी दिल्ली : टीम इंडियाच्या क्रिकेटपटूंनी लष्करातील जवानांची भेट घेतली. बीसीसीआय अध्यक्ष अनुराग ठाकूर यांच्याबरोबर रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, केदार जाधव आणि मनिष पांडे हे क्रिकेटपटू यावेळी उपस्थित होते.
भारताचे जवान आमचे रिअल हिरो असल्याचं मत यावेळी या क्रिकेटपटूंनी व्यक्त केलं. यावेळी या जवानांना क्रिकेटपटूंनी दिवाळीच्या शुभेच्छाही दिल्या.
खेळाडूंनी यावेळेस सेनेच्या अनेक हत्यारांना जवळून पाहिलं आणि त्याची माहिती करुन घेतली. या दरम्यान भारतीय क्रिकेटर उत्साहात दिसत होते.