तेहरान : भारतीय शूटर हिना सिद्धू हिनं एशियाई एअरगन शूटिंग चॅम्पियनशिपमधून स्वत:च नाव माघारी घेतलंय. या चॅम्पियनशीपमध्ये खेळण्यासाठी 'हिजाब'ची सक्ती करण्यात आली होती. ही सक्ती धुडकावत लावत हिनानं स्वत:च या चॅम्पियनशीपवर बहिष्कार टाकला.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इराणची राजधानी तेहरानमध्ये होणाऱ्या या चॅम्पियनशिप दरम्यान हिना खेळणार नाही हे आता स्पष्ट झालंय. याची माहिती स्वत: हिनानं ट्विट करून दिलीय. 


'मी क्रांतीकारी नाही परंतु, व्यक्तिगत रुपात मला असं वाटतंय की कोणत्याही खेळाडुला हिजाब परिधान करण्याची सक्ती खेळ भावनेसाठी योग्य नाही. एक खेळाडू असल्याचा मला अभिमान आहे... कारण वेगवेगळ्या संस्कृती, पृष्ठभूमी, लिंग, विचारधारा आणि धर्माचे लोक कोणत्याही पूर्वाग्रहाशिवाय एकमेकांसोबत खेळतात. खेळ मनुष्याचे प्रयत्न आणि प्रदर्शनाचं प्रतिनिधित्व करतात' असं हिनानं आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय. 







हिनानं या वर्षीच्या रिओ ऑलिम्पिक स्पर्धेतही सहभाग घेतला होता. यात ती 10 मीटर एअर पिस्टल स्पर्धेत 14 व्या क्रमांकावर राहिली होती. यापूर्वी तिनं 2013 साली वर्ल्डकपमध्ये गोल्ड मेडल पटकावलं होतं.