मुंबई : यंदाच्या आयपीएलमुळे भारतीय अंपायर्सचे अच्छे दिन आले असंच म्हणावं लागेल. अनिल चौधरी, सी.के.नंदन आणि सी. शमसुद्दीन यांना प्रत्येकी 4 मिलीयन म्हणजेच जवळपास 40 लाख रुपये मिळाले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिल्लीचे अनिल चौधरी यांना 39.63 लाख रुपये तर नंदन आणि शमसुद्दीन यांना 40.83 लाख रुपये मिळाले आहेत. भारताचा माजी फास्ट बॉलर जवागल श्रीनाथला आयपीएलमध्ये मॅच रेफ्री म्हणून 26 लाख रुपये मिळाले.