बंगळूरु : कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यातील सामन्यात पावसाने हजेरी लावलीये. सामन्यातील पहिल्या डावानंतर पावसाने जोरदार हजेरी लावली ज्यामुळे दुसरा डावच सुरु होऊ शकलेला नाही. ही बातमी लिहिपर्यंत पाऊस थांबलेला नव्हता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोलकाताच्या गौतम गंभीरने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. हैदराबादने २० षटकांत १२८ धावा केल्या. 


रिपोर्टनुसार, ११.५२ पर्यंत सामना सुरु झाल्यास कोलकाताला पूर्ण २० षटके खेळण्यास मिळतील. यात त्यांना १२९चे लक्ष्य गाठावे लागेल. जर सामना १२.२६ वाजून सुरु झाल्यास कोलकाताला विजयासाठी ५ षटकांत ४१ धावांचे लक्ष्य मिळेल. 


सामना १.२० वाजता सुरु झाल्यास सुपरओव्हर खेळली जाईल यात दोन्ही संघाना सारखीच संधी मिळणार आहे. दरम्यान, पावसामुळे सामना रद्द झाल्यास
हैदराबादला रॉबिन राऊंडमधील चांगल्या कामगिरीनुसार दुसऱ्या क्वालिफायरमध्ये खेळण्याची संधी मिळेल. त्यामुळे पावसावर कोलकाताचे आयपीएलमधील स्थान अवलंबून आहे.