मुंबई : आयपीएलच्या दहाव्या पर्वाचा दुसरा सामना आज पुण्यातल्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएन स्टेडियमवर रंगणार आहे. मुंबई इंडियन्स आणि रायजिंग पुणे सुपरजाएंट्स या दोन महाराष्ट्रातील संघांमध्ये ही लढत रंगणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा सामना वेगवेगळ्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणार असल्याने क्रिडाप्रेमींचं बारीक लक्ष आजच्या सामन्यावर आहे.


गेल्या मोसमात महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्त्वाखाली हा रायजिंग पुणे सुपरजाएंट्स संघ टूर्नामेंटमध्ये उतरला. मात्र तरीही क्रमवारीत सगळ्यात शेवटच्या क्रमांकावर राहिला. धोनीचं नेतृत्वही संघाला तारू शकलं नव्हतं.


या मोसमात मात्र संघाचं नेतृत्व स्टीव्ह स्मिथकडे देण्यात आलंय. राजस्थान रॉयल्सच्या नेतृत्वाच्या अनुभवावर तो पुण्याला क्रमवारीत वर नेण्याचा प्रयत्न करेल. तसंच मराठमोळ्या अजिंक्य रहाणेकडूनही चांगल्या परफॉमन्सची अपेक्षा आहे.


हा सिझनमधला त्यांचा पहिला सामना ते घरच्या मैदानावर खेळणार आहेत. कदाचित मुंबई इंडियन्ससाठी ही एक कमकुवत बाजू असणार आहे. अर्थात त्यांना आपल्या चाहत्यांची आणि त्यांच्या पाठींब्याची उणीव भासेल. हिटमॅन रोहीत शर्मा संघाचं कर्णधारपद सांभाळणार आहे. 


मात्र या जबाबदारीसोबतच त्याला संघासाठी धावाही काढाव्या लागतील. पार्थिव पटेल किंवा लेंडल सिमन्ससोबत रोहीत इनिंगची ओपनिंग करू शकतो.


दोन्ही संघातील खेळाडू


मुंबई इंडियन्स: रोहित शर्मा (कर्णधार) जसप्रीत बुमरा, जॉस बटलर, श्रेयस गोपाल, क्रिष्णप्पा गोथम, असेला गुणरत्ने, हरभजन सिंह, मिचेल जॉनसन, कुलवंत खेजरोलिया, सिद्धेश लॅड, माइकल मॅकलॉगेन, लसिथ मलिंगा, हार्दिक पांड्या, क्रुणाल पांड्या, पार्थिक पटेल, कॅरन पोलार्ड, निकोलस पूरन, दीपक पुनिया, नितिश राणा, अंबाती रायडू, जीतेश शर्मा, करन शर्मा, एल सिमंस, टिम साउदी, जगदीश सुचिथ, सौरभ तिवारी, विनय कुमार


राइजिंग पुणे सुपरजॉएंट्स : स्टीव स्मिथ (कर्णधार) एमएस धोनी, अजिंक्य रहाणे, बेन स्टोक्स, फॅफ डू प्लेसिस, उस्मान ख्वाजा, मनोज तिवारी, मयंक अग्रवाल, अंकित शर्मा, बाबा अपराजित, अंकुश बेंस, रजत भाटिया, दीपक चहर, राहुल चहर, डॅनियल क्रिस्टीयन, अशोक डिंडा, लोकी फर्ग्युसन, जसकरण सिंह, सौरभ कुमार, मिलिंद, टंडन, जयदेव उनाडकत, अॅडम जम्पा