मुंबई :  क्रिकेटेन्मेंट म्हणून गेल्या आठ वर्षापासून भारतीयांच्या मनावर अधिराज्य करणाऱ्या या 'क्रिकसम्राटा'वर टीव्हीवर कोणी प्रेक्षक देतयं का प्रेक्षक अशी म्हणण्याची वेळ आली आहे. 


कशामुळे फटका 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

क्रिकेट आणि आयपीएलमध्ये वादाचा फटका क्रिकेटच्या या प्रकाराला यंदा जोरदार बसला आहे. गेल्या वर्षांच्या तुलने टीव्हीवर प्रेक्षकांची संख्या घटली आहे.  या संदर्भात टाइम्स ऑफ इंडियाने टेलिव्हिजन व्ह्युअरशीप रेटिंग (टीव्हीआर) जारी केला असून गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा प्रेक्षकांच्या संख्या रोडावली असल्याचे नमूद केले आहे. 


काय होता थाट...


गेल्या वर्षी टेलिव्हिजन रेटिंग ४.५ अशी होते. ती आता ३.५ पर्यंत खाली आली आहे.  आयपीएलच्या इतिहासातील  दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात कमी  रेटिंग आहे. यापूर्वी २०१४ मध्ये सर्वात कमी ३.१ रेटिंग होते. तर सर्वात जास्त रेटिंग २०१४मध्ये  सर्वाधिक ४.६ रेटिंग होते. तसेच २०१३ मध्ये कमी रेटिंग ३.८ मिळाली होती. 


काय होते वाद...


देशातील बहुतांशी राज्यात दुष्काळाची परिस्थिती आहे. त्यामुळे खूप मोठा वाद निर्माण झाला. याचा फटका आयपीएलला बसला आहे. दुष्काळ असताना क्रिकेटसाठी मोठ्याप्रमाणावर पाण्याची नासाडी होते, त्यामुळे महाराष्ट्रातून सामने दुसऱ्या राज्यात हलविण्यात आले. मुंबई इंडियन्स आता जयपूरमध्ये खेळणार आहे.