हैदराबाद : टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत झालेल्या दुखापतीतून धडाकेबाज फलंदाज युवराज सिंग अद्याप तंदुरुस्त झालेला नाही. त्यामुळे ‘आयपीएल'च्या आगामी ९ व्या सीजनच्या पर्वामध्ये किमान दोन आठवडे तो खेळू शकणार नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

युवराजच्या घोट्याला टी-२० वर्ल्डकपमध्ये दुखापत झाली होती. त्यानंतर धाव घेतानाही त्याला त्रास होत होता. या दुखापतीमुळे विश्‍वकरंडक स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या लढतीमध्येही युवराज खेळू शकला नव्हता. युवराज यावेळी सनरायझर्स हैदराबाद या संघातून खेळणार आहे.


सनरायझर्स हैदराबाद‘चे प्रशिक्षक टॉम मूडी यांनी युवराजच्या दुखापतीबाबत चिंता व्यक्त केलेय. ‘दुर्दैवाने, युवराज किमान दोन आठवड्यांसाठी स्पर्धेबाहेर गेला आहे. तो पूर्णपणे तंदुरुस्त कधी होऊ शकेल, हे आता सांगता येणार नाही.