मुंबई : भारताचा क्रिकेटपटू इरफान पठाणने दोन दिवसांपूर्वीच मॉडेल सफा बेग हिच्याशी गुपचूप लग्न केले. त्यानंतरचा पहिला फोटो इरफानने आपल्या ट्विटर अकाउंटवरुन शेअर केलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावेळी चाहत्यांनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल त्याने सर्वांचे आभार मानले तसेच जीवनातील सर्वात सुंदर टप्प्यात प्रवेश केल्याचे तो यावेळी म्हणाला. असे त्याने ट्विट केलेय. 


रविवारी काही मोजक्या कुटुंबियांच्या उपस्थितीत इरफान सफा बेग हिच्याशी विवाहबंधनात अडकला. सफा आणि इरफानची पहिली भेट दुबईत झाली होती. त्यावेळी त्यांनी लग्न करण्याचा विचार केला होता.