मोहाली : टी-२० वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये दाखल होण्यासाठी भारतीय संघाला आज ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना जिंकणे गरजेचे आहे. हे मैदान म्हणजे भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू युवराज सिंगचे घरचे मैदान.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यामुळे घरच्या मैदानावर युवीकडून चाहत्यांच्या मोठ्या अपेक्षा असतील. मात्र मोहालीतील हा सामना युवीचा अखेरचा सामना असल्याची शक्यता आहे. यापूर्वी २००९मध्ये मोहालीच्या मैदानावर भारताचा सामना श्रीलंकेशी झाला होता. या सामन्यात भारताने विजय मिळवला होता. यावेळी युवराज सिंगने अष्टपैलू खेळी केली होती. त्याने २३ धावात तीन गडी तर नाबाद ६० धावा तडकावल्या होत्या.


आजच्या सामन्यातही युवराज कशी कामगिरी करतो याबद्दल साऱ्यांनाच उत्सुकता आहे. त्याची ऑस्ट्रेलियाविरुद्ध २००७मध्ये केलेली खेळी अद्यापही चाहते विसरलेले नाहीत. तोच धडाकेबाज युवी पुन्हा मोहीलच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाविरोधात पाहायला मिळेल अशी अपेक्षा सर्वच भारतीय चाहत्यांची आहे.