नवी दिल्ली : भारताचा वेगवान गोलंदाज इशांत शर्मा आणि बास्केटबॉलपटू प्रतिमा सिंह आज लग्नबंधनात अडकले. इशानने पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेऊन त्यांचे आर्शीवाद घेतले. तर त्याच्या लग्नाला टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि नुकताच हेजलशी विवाह केलेला युवराज सिंग यांच्या खास उपस्थिती होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रतिमा सिंग ही वाराणसीची असून भारतीय बास्केटबॉल संघाची ती माजी कर्णधार होती. प्रतिमाच्या बहिणीसुद्धा बास्केटबॉलपटू आहेत. १९ जून रोजी दिल्लीतील एका सोहळ्यात इशांत आणि प्रतिमाचा साखरपुडा झाला होता.


२०११ मध्ये बास्टेकबॉल कोर्टवरच इशांत आणि प्रतिमाची भेट होती. रिबा बास्केटबॉल लीगच्या समारोप सोहळ्यात इशांत प्रमुख पाहुणा म्हणून उपस्थित होता. तिथेच सामन्यादरम्यान प्रतिमाच्या जबरदस्त खेळामुळे इशांत शर्मा प्रभावित झाला. त्यानंतर दोघांमध्ये मैत्री झाली आणि त्याचे रुपांतर प्रेमात झाले. इशांत यांने भाजपमध्ये प्रवेश केला असून तो विधानसभा निवडणुकीला उभा राहला होता. त्याला पराभवाचा धक्का बसला.