मुंबई : 2007च्या वर्ल्ड कपमध्ये भारताला साखळी सामन्यातच बाद व्हायची नामुष्की ओढावली होती. या पराभवानंतर भारतीय मीडियानं जी वागणूक दिली तेव्हा दहशतवादी असल्यासारखं वाटल्याची खंत महेंद्रसिंग धोनीनं व्यक्त केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वेस्ट इंडिजमधून परत आल्यावर आम्हाला दिल्ली विमानतळावरून पोलीस व्हॅनमध्ये ठेवण्यात आलं. पोलीस व्हॅनमधून आम्हाला घेऊन जात असताना मीडियानं आमचा पाठलाग केला, तेव्हा आम्ही दहशतवादी किंवा खुनी असल्यासारखं वाटल्याचं धोनी म्हणाला. 


2007 च्या पराभव विसरून आम्ही 2011 च्या तयारीला लागलो. यानंतर 2011 च्या वर्ल्ड कपमध्ये भारतानं काय केलं हे सगळ्यांना माहिती आहे, अशी प्रतिक्रिया धोनीनं दिली आहे. 'एम.एस.धोनी- द अनटोल्ड स्टोरी' या धोनीच्या बायोपिकच्या प्रमोशनच्या कार्यक्रमात धोनीनं हे वक्तव्य केलं आहे.