टी-२० वर्ल्डकप जिंकून देणारा जोगिंदर शर्मा पोलीससेवेत
सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये असलेली टीम इंडिया यंदाच्या वर्ल्डकपसाठी विजेतेपदाची प्रबळ दावेदार मानल जातयं. मात्र तुम्हाला माहीत आहे का तो दिवस ज्या दिवशी २००७मध्ये फायनलमध्ये पाकिस्तानला हरवल्यावर टी-२०चा पहिला वर्ल्डकप जिंकला होता.
नवी दिल्ली : सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये असलेली टीम इंडिया यंदाच्या वर्ल्डकपसाठी विजेतेपदाची प्रबळ दावेदार मानल जातयं. मात्र तुम्हाला माहीत आहे का तो दिवस ज्या दिवशी २००७मध्ये फायनलमध्ये पाकिस्तानला हरवल्यावर टी-२०चा पहिला वर्ल्डकप जिंकला होता.
या वर्ल्डकपमध्ये अखेरच्या षटकांत कर्णधार धोनीने नवी खेळी करताना जोगिंदर शर्माच्या हातात बॉल दिला. धोनीच्या या निर्णयाने सर्वांनाच आश्चर्य वाटलं होत मात्र जोगिंदरने जबरदस्त गोलंदाजी करताना भारताला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. मात्र विजयाचा हा हिरो सध्या काय करतोय तुम्हाला माहीत आहे का?
टीम इंडियाचा वर्ल़्ड टी-२०चा हिरो जोगिंदर आता हरयाणा पोलीस दलात डीएसपी पदावर कार्य़रत आहे. साडे आठ वर्षानंतर तो पूर्णवेळ या पदावर कार्यरत आहे. नुकताच त्याने क्रिकेटर मोहित शर्माच्या लग्नात हजेरी लावली होती.
इतकंच नव्हे तर जोगिंदरने नुकताच कर्णधार धोनीच्या जीवनावर आधारित चित्रपटात छोटीशी भूमिकाही केलीये. जोगिंदरने त्याच्या मुलाचे नाव उद्य वीर असं ठेवलेय जोगिंदर त्याला प्रेमाने युवी अशी हाक मारतो.