अहमदाहबाद : कबड्डी वर्ल्डकप 2016चा थरार अंतिम टप्प्यात येऊन पोहोचलाय. वर्ल्डकपची ट्रॉफी उंचावण्यासाठी यजमान भारत आणि इराण हे दोन्ही संघ सज्ज झाले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत भारताची लढत इराणशी होणार आहे. सेमीफायनलमध्ये इराणने दक्षिण कोरियाला हरवत अंतिम फेरीत मजल मारली तर दुसरीकडे यजमान भारताने थायलंडला मोठ्या फरकाने हरवत अंतिम फेरीत प्रवेश केला.


सलग तिसऱ्यांदा भारत वर्ल्डकप जिंकण्यासाठी सज्ज झालाय. तर दुसरीकडे इराण पहिल्यांदा वर्ल्डकपवर नाव कोरण्यास मैदानावर तयारिनीशी उतरेल. त्यामुळे इराणच्या आव्हानापुढे कॅप्टन कूल अनुप कुमारची कसोटी लागणार आहे. 


प्रदीप नरवाल, अजय ठाकूर, संदीप नरवाल, यांच्या चढायांवर चाहत्यांचे लक्ष असेल तर दुसरीकडे सुरजीत, मनजीत चिल्लर, सुरिंदर नाडा यांच्या बचावफळीची मदार असेल. रात्री 9 वाजता एरिना स्टेडियमवर हा सामना सुरु होईल.