कराची :  कराचीचा तेज गोलंदाज मोहम्मद अलीने असा कारनामा केला की जे प्रत्येक गोलंदाजाचे स्वप्न असते. अंडर -१९ तीन दिवसीय आंतर जिल्हा सामन्यात या वंडर बॉयने कोणत्याही फिल्डरच्या मदतीने एका इनिंगमध्ये १० विकेट घेतल्या यातील ९ बोल्ड तर एक पायचीतची विकेट आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जीम लेकरही असं करू शकला नव्हता. 


१९६१ मध्ये इंग्लंडचा ऑफ ब्रेक जिम लेकर याने ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या सामन्यात एका इनिंगमध्ये दहा विकेट घेतल्या होत्या. पण यात फक्त त्याने दोघांना बोल्ड केले होते. 


कुंबळेलाही मागे टाकले 
१८ वर्षांपूर्वी अनिल कुंबळे याने दिल्लीच्या कोटला स्टेडिअमवर पाकिस्तान विरूद्ध दहा विकेट घेतल्या होत्या. या इनिंगमध्ये त्याने फक्त दोन गोलंदाजांना बोल्ड केले होते. 


पण रेकॉर्ड बूकमध्ये सामील नाही मो. अली
मोहम्मद अलीचा हा जबरदस्त रेकॉर्ड बूकमध्ये सामील करण्यात आलेला नाही.  जिल्हा स्तरिय सामन्यांना अधिकृत दर्जा प्राप्त नाही. विशेष म्हणजे प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पाकिस्तानच्या चार गोलंदाजांनी एका इनिंगमध्ये दहा विकेट घेतल्या आहेत. नईम अख्तर, शाहिद महबूब, इमरान आदिल आणि जुल्फिकार बाबर अशी त्यांची नावे आहेत.