मुंबई: इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेल्या केव्हिन पिटरसनचं पुन्हा एकदा इंग्लंडकडून खेळायचं स्वप्न आता जवळपास अशक्य झालं आहे. त्यामुळे आता दक्षिण आफ्रिकेकडून खेळण्याचा विचार पिटरसन करत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आंतरराष्ट्रीय क्रिकेट मी मिस करतोय, त्यामुळे दक्षिण आफ्रिकेकडून खेळण्याच्या विचारात मी असल्याचं खुद्द पिटरसननं कबूल केलं आहे. 


2018 साली पिटरसन दक्षिण आफ्रिकेकडून खेळायला पात्र होईल. 2013-14 च्या ऍशेसमध्ये पिटरसन इंग्लंडकडून शेवटचा खेळला होता. त्यानंतर इंग्लंड क्रिकेट बोर्डानं त्याला डच्चू दिला होता. 


पिटरसन आता पुन्हा इंग्लंडकडून खेळू शकत नाही, असं वक्तव्य सरे क्रिकेट काऊंटीचा डायरेक्टर आणि इंग्लंडचा माजी खेळाडू ऍलेक स्टुअर्टनं केलं होतं. 


दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट बोर्डानं पिटरसनला संधी दिली तर तो इंग्लंडमध्ये 2019 मध्ये होणारा क्रिकेट वर्ल्ड कप खेळू शकेल, पण तेव्हा तो 38 वर्षांचा असेल.