भारताच्या कन्यांचा होणार खेलरत्ननं सन्मान
रिओ ऑलिम्पिकमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या भारताच्या कन्यांना खेलरत्न पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे.
नवी दिल्ली : रिओ ऑलिम्पिकमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या भारताच्या कन्यांना खेलरत्न पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे. पी.व्ही.सिंधू, दीपा कर्माकर, साक्षी मलिक या भारताच्या कन्यांबरोबरच जीतू रायलाही खेलरत्न पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे.
रिओ ऑलिम्पिकमध्ये पी.व्ही.सिंधून बॅडमिंटनमध्ये सिल्व्हर, साक्षी मलिकनं कुस्तीमध्ये ब्रॉन्झ मेडल पटकावलं आहे.
याबरोबरच अजिंक्य रहाणे, ललिता थापर, शिव थापा आणि अपूर्वी चंडेला यांना अर्जून पुरस्कार देण्यात येणार आहे.