मुंबई : इंग्लंडविरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये असल्यामुळे विराट कोहलीला टेस्ट रॅकिंगमध्येही फायदा झाला आहे. बॅट्समनच्या रॅकिंगमध्ये विराट कोहली दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. विराटच्या टेस्ट कारकिर्दीमधली हा आत्तापर्यंतची सर्वोत्तम रॅकिंग आहे. या सीरिजमध्ये आत्तापर्यंत झालेल्या चार टेस्टमध्ये विराटनं 640 रन केल्या आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बॅट्समनच्या या रॅकिंगमध्ये पहिल्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या टेस्टमध्ये कोहलीनं एकाच इनिंगमध्ये केलेल्या 235 रनमुळे कोहलीला 53 पॉईंट्स मिळाले. टेस्ट क्रिकेटमध्ये दुसऱ्या क्रमांकावर असणारा विराट कोहली वनडेमध्येही दुसऱ्या तर टी-20मध्ये पहिल्या क्रमांकावर आहे.


तर टेस्ट बॉलरच्या रॅकिंगमध्ये भारताचाच आर.अश्विन पहिल्या क्रमांकावर कायम आहे. मुंबई टेस्टमध्ये अश्विननं घेतलेल्या 12 विकेटमुळे भारताचा इनिंग आणि 36 रननं विजय झाला होता. अश्विननंतर श्रीलंकेचा रंगना हेरात या क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर आहे.