मोहाली : इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टमध्ये कोहली आणि पुजारानं पुन्हा एकदा भारताला सावरलं आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताचा स्कोअर 271/6 एवढा होता. दिवसाअखेर अश्विन 57 रनवर नाबाद तर जडेजा 31 रनवर नाबाद खेळत होते. पहिल्या इनिंगमध्ये भारत अजून 12 रननी पिछाडीवर आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दुसऱ्या दिवशी इंग्लंडचा पहिला डाव 283 रनवर आटोपला. यानंतर ओपनिंगला आलेल्या पार्थिव पटेलनं 42 तर मुरली विजयनं 12 रन केल्या. या दोघांची विकेट गेल्यानंतर कोहलीनं 62 आणि पुजारानं 51 रनची खेळी केली.


कोहली आणि पुजाराची विकेट पडल्यानंतर भारताची पुन्हा एकदा पडझड आणि अजिंक्य रहाणे शून्यवर तर करुण नायर 4 रनवर रनआऊट झाला. यानंतर मात्र अश्विन आणि जडेजानं ही पडझड थांबवली. गेल्या काही मॅचमध्ये कोहली वगळता भारतीय बॅट्समनच्या फॉर्मवर नजर टाकली तर भारत कोहलीवरच जबाबदार आहे का असा प्रश्न यानिमित्तानं उपस्थित होत आहे.