हरारे : अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात भारताला दोन धावांनी पराभव पत्करावा लागला. अखेरच्या चेंडूत विजयासाठी ४ धावा हव्या असताना धोनीला मात्र केवळ एक धाव करता आली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावर स्पष्टीकरण देताना धोनी म्हणाला, अखेर स्पर्धा बॉल आणि बॅट यांच्यात आहे. माझ्या मते शेवटचा चेंडू चांगला होता. धोनीला सामन्याचा फिनिशर असे म्हटले जाते.


अनेकदा शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेले सामने धोनीने जिंकवून दिले आहेत. त्यामुळे पहिल्या टी-२० सामन्यातही धोनी फिनिशरचा शॉट लगावेल असे क्रिकेट चाहत्यांना वाटले होते मात्र धोनीला त्या बॉलवर केवळ एक धाव करता आली.


हा सामना अननुभवी फलंदाजांसाठी चांगला ध़डा होता. ते त्यांच्या क्षमतेनुसार खेळले नाहीत. अनेक विकेट चुकीच्या पद्धतीने पडल्या. तुम्ही घरच्या मैदानावर चांगले खेळू शकता. मात्र भारत अं संघातून भारत संघात खेळताना दबावा असतो. फलंदाजांनी काही चुका केल्या, असे धोनी पुढे म्हणाला.