कोलकाता : वेस्ट इंडिजच्या कार्लोस ब्राथवेटने इंग्लंडविरुद्धच्या अंतिम सामन्यात ते चार सिक्स ठोकत संघाला टी-२०चे जेतेपद मिळवून दिले. सामन्यातील त्या अखेरच्या ओव्हर्सबद्दल खुद्द ब्राथवेटने खुलासा केलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सॅम्युअल्स ८० रन्सवर खेळत होता आणि तो लीड करत होता. मला वाटले तो बाऊंड्री लावेल. क्रिस जॉर्डनने जबरदस्त बॉलिंग केली. त्याच्या यॉर्करवर सॅम्युअल्स जास्त धावा बनवू शकला नाही. त्यामुळे २०व्या ओव्हरमध्ये मला शॉट मारावे लागले कारण दबाव खूप होता. 


२०वी ओव्हर सुरु होण्याआधी सॅम्युअल्स माझ्याकडे आला आणि काहीही होवू बॅटवर बॉल नाही लागला तरी रन बनवण्यासाठी धावावंच लागेल. मात्र जेव्हा पहिल्याच बॉलवर मी सिक्स मारला तेव्हा मला वाटले की स्टोक्स बॉल टाकण्यात चुकला त्यामुळे असे झाले. त्यानंतर दुसरा बॉल मी केवळ हिट केला आण बॉल बाऊंड्रीपार गेला. आता मी हिरो बनण्याच्या जवळ पोहोचलो होतो. आता आम्हाला ४ बॉलमध्ये ७ रन्स हवे होते. मी पुन्हा सिक्स मारला. खरतर ही मिस हिट होती. आम्हाल या बॉलवर सिंगल रन्स घ्यायचा होता. मात्र हा माझा शानदार शॉट होता. 


चौथ्या बॉलमध्ये मी विचार केला होता की काहीही करुन बॉल हिट करायचा. कारण मॉर्गनने सर्व फिल्डरर्सना जवळ बोलावले होते. त्यामुळे सिंगल रन काढणे कठीण होते. तसेच झाले. मी पुन्हा सिक्स मारला आणि आम्ही जिंकलो, असे ब्राथवेट म्हणाला. 


वेस्ट इंडिजने अंतिम सामन्यात इंग्लंडवर चार विकेट राखून विजय मिळवत दुसऱ्यांदा वर्ल्डकपला गवसणी घातली.