दिल्ली: आयपीएलचा यंदाचा सिझन आता शेवटाकडे येऊन ठेपला आहे. त्यामुळे प्ले ऑफ मध्ये कोणत्या टीम पोहोचणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. आज दिल्ली आणि हैदराबादमध्ये महत्त्वाची मॅच होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या मॅचमध्ये दिल्लीनं टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला आहे. मुंबई इंडियन्सच्या दृष्टीनंही ही मॅच महत्त्वाची असणार आहे. कारण या मॅचमध्ये दिल्लीचा पराभव झाला तर मुंबई, बंगळुरू आणि कोलकत्याला फायदा होणार आहे. 


12 मॅचमध्ये दिल्लीचे 12 पॉईंट्स आहेत. ही मॅच दिल्ली हरली तर ते शेवटची मॅच जिंकले तरी 14 पॉईंट्सपर्यंत पोहोचू शकतात. तर मुंबई, बंगळुरू आणि कोलकत्याचे 13 मॅचमध्ये 14 पॉईंट्स आहेत. त्यामुळे शेवटची मॅच जिंकून हे तिन्ही संघ प्ले ऑफ साठीचं आपलं आवाहन कायम ठेवू शकतील.


पाहा लाईव्ह स्कोअर