राजकोट : आयपीएलमध्ये गुजरात लायन्स आणि दिल्ली डेयरडेविल्स यांच्यामध्ये पुन्हा एकदा दिल्लीने बाजी मारली आहे. दिल्लीने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिनेश कार्तिक आणि जडेजा यांच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर गुजरात लायन्सने १५० धावांचं टार्गेट उभं केलं. दिल्लीच्या टीमने ही दमदार सुरुवात केली. ओपनर्स डिकॉक आणि पंतने 13 ओव्हरपर्यंत जोरदार बॅटींग केली.


पंतने 40 बॉलमध्ये 69 रन तर डिकॉकने 45 बॉलमध्ये 46 रन केले. पंतने डिकॉकसोबत मिळून 81 बॉलमध्ये 115 रनची पार्टनरशीप केली. यामुळे दिल्लीला सहज विजय मिळवता आला.


पाहा स्कोरकार्ड