नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या लोढा समितींच्या शिफारशींची अंमलबजावणी करण्यास भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) टाळाटाळ करत असल्याच्या मुद्द्यावरून सर्वोच्च न्यायालयाने आज 'बीसीसीआय'ला चांगलेच फटकारले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावेळी सर्वोच्च न्यायलयाने बीसीसीआयला कडक इशार दिला आहे. लोढा समितीने सुचविलेल्या बदलांची अंमलबजावणी ‘बीसीसीआय’ने करावी, अन्यथा तसे बदल करण्यासाठी आम्हाला भाग पाडावे लागेल, असे स्पष्ट न्यायालयाने बजावले आहे.


बीसीसीआय जर स्वत:ला कायद्यापेक्षा मोठे समजत असेल तर ती त्यांची चूक आहे, आदेशांची अंमलबजावणी कशी करून घ्यायची हे कोर्टाला चांगलं माहीत आहे. त्यामुळे दिलेल्या आदेशांचे पालन करा, असा  इशारा सर्वोच्च न्यायालयाने दिलाय.


बीसीसीआयचे अध्यक्ष अनुराग ठाकूर यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांना पदावरून हटविले पाहिजे, असे लोढा समितीने अहवालात म्हटले आहे. त्याला बीसीसीआयने विरोध केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआयच्या या भूमिकेवर आक्षेप घेत लोढा समितीने सुचविलेल्या बदलांबाबत उत्तर देण्यासाठी ६ ऑक्टोबरपर्यंतची मुदत दिली आहे.