मुंबई : टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांने बांग्लादेशविरुद्ध सामना जिंकला. तसेच खेळाताना धोनीने १३ रन्स केलेत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये १००० रन्स पूर्ण करण्याचा विक्रम आपल्या नावावर केलाय. १००० रन्स बनविणारा धोनी जगातील २९ वा खेळाडू आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तर धडाकेबाज खेळाडू विराट कोहली टी-२०ने ४० सामन्यात १४४६ रन्स केल्यात. तो भारतातील पहिला तर जगातला १० वा खेळाडू ठरलाय. रोहित शर्माने ५७ सामन्यात १२१९ रन्स केल्यात. तो १९ व्या क्रमांकावर आहे. सुरेश रैनाने ५९ सामने केळत ११६३ रन्स केल्यात तो २३ व्या स्थानावर आहे. युवराज सिंग यानेही ५३ सामन्यात १११० रन्स केल्यात तो २५व्या नंबरवर आहे.


टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक रन्स बनविण्याचा विक्रम न्यूझीलंडचा ब्रॅन्डन मॅकलम याच्या नावावर आहे. त्याने टी-२० क्रिकेटमध्ये २१४० रन्स केल्यात. त्यानंतर श्रीलंकेचा दिलशान याचा नंबर आहे. त्याने १८४६ केल्यात.


आश्चर्य म्हणजे धोनीने टी-२० क्रिकेटमध्ये अजूनही ५० रन्स केलेल्या नाहीत. त्याने ४८ रन्सचे योगदान दिलेय. मात्र, त्याच्या नावावर अर्धशतकाची नोंद नाही. धोनीने ६६ सामन्यात १००८ रन्स केल्यात.