क्रिकेट खेळाडूंच्या हातात आता डीएससीच्या बॅट
डिलक्स स्पोर्ट कंपनीने आता क्रिकेटला लागणारं साहित्य देखील बनवायला सुरुवात केली आहे.
मुंबई : डिलक्स स्पोर्ट कंपनीने आता क्रिकेटला लागणारं साहित्य देखील बनवायला सुरुवात केली आहे. आयपीएलच्या १० व्या सीजनमध्ये देखील डीएससीचे साहित्य खेळाडूंकडे पाहायला मिळणार आहेत. आयपीएलमध्ये वेगवेगळ्या टीममध्ये खेळणाऱ्या १२ खेळांडूकडे डीएससीची बॅट आणि इतर साहित्य पाहायला मिळणार आहेत.
डीएससी कंपनी बॅट, ग्लव्स आणि लेगगार्डस बनवते. अक्षर पटेल, अनुरीत सिंग, केसी कॅरीअपा, बिपूल शर्मा, प्रवीन तांबे, मोहम्मद सिराज, सयन घोष, शशांक सिंग, दीपक पुनिया, मनोज तिवारी, ऋषी धवन, वॉशिंग्टन सुंदर या खेळाडूंच्या हातात आपल्याला डीसीएसच्या बॅट पाहायला मिळणार आहे.
डीसीएस ही कंपनी गेल्या ४० वर्षांपासून एक चांगला ब्रँड म्हणून स्पोर्टस साहित्य तयार करत आहे. एसएस, एसजी अशा इतर वेगळ्या कंपन्या देखील मार्केटमध्ये यांचे स्पर्धक आहेत.