वेस्ट इंडिजला बिनडोक म्हणणाऱ्यानं मागितली माफी
वेस्ट इंडिजच्या खेळाडूंना कमी डोकं असतं, असं वादग्रस्त वक्तव्य करणारा ब्रिटीश समालोचक मार्क निकोलासनं वेस्ट इंडिजचा कॅप्टन डॅरेन सॅमीची माफी मागितली आहे.
मुंबई: वेस्ट इंडिजच्या खेळाडूंना कमी डोकं असतं, असं वादग्रस्त वक्तव्य करणारा ब्रिटीश समालोचक मार्क निकोलासनं वेस्ट इंडिजचा कॅप्टन डॅरेन सॅमीची माफी मागितली आहे.
टी 20 वर्ल्ड कप सुरु व्हायच्या आधी लिहिलेल्या एका लेखामध्ये निकोलास यांनी हे वक्तव्य केलं होतं. यावर डॅरेन सॅमीनं नाराजी व्यक्त केली होती.
वेस्ट इंडिजच्या खेळाडूंना मी बिनडोक म्हंटलं नाही, पण क्रिकेटच्या परंपरेचा अपमान करणारं वक्तव्य माझ्याकडून झालं. वर्ल्ड कप वेस्ट इंडिजनं जिंकला नसता तरी मी माफी मागितली असती असं स्पष्टीकरण निकोलास यांनी दिलं आहे.