कोलकता: टी 20 वर्ल्डकपवर पुन्हा एकदा वेस्ट इंडिजनं आपलं नाव कोरलं आहे. टी 20 वर्ल्ड कप जिंकण्याची वेस्ट इंडिजची ही दुसरी वेळ आहे. या आधी 2012 च्या टी 20 वर्ल्ड कपमध्ये वेस्ट इंडिजनं फायनलमध्ये श्रीलंकेला धुळ चारली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वेस्ट इंडिजच्या या दोन्ही ऐतिहासिक विजयाचा हिरो ठरला मारलोन सॅम्युअल्स. इंग्लंडविरुद्धच्या यंदाच्या फायनलमध्ये सॅम्युअल्सनं 66 बॉलमध्ये 85 रन केल्या, तर 2012 च्या श्रीलंकेविरुद्धच्या फायनलमध्ये सॅम्युअल्सनं 56 बॉलमध्ये 78 रन बनवल्या होत्या. 


मुख्य म्हणजे या दोन्ही फायनलमध्ये सॅम्युअल्सच मॅन ऑफ द मॅच ठरला.