पुणे: आयपीएलमध्ये आपला पहिलाच सिझन खेळणाऱ्या पुण्याची कामगिरी निराशाजनक राहिली आहे. आत्तापर्यंत पुण्यानं खेळलेल्या सात मॅचमध्ये त्यांना फक्त दोन विजय मिळवता आले आहेत. पुण्याच्या मोठ्या खेळाडूंना झालेल्या दुखापतीचा फटकाही टीमला बसला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यामध्ये आता आणखी एका खेळाडूची भर पडली आहे. ऑल राऊंडर मिचेल मार्श आयपीएलमधून आउट झाला आहे. ट्रेनिंग करताना मार्शच्या ओटीपोटामध्ये दुखायला लागलं. मार्शचं स्कॅनिंग केल्यानंतर त्याला अधिक उपाचारांची गरज असल्याचं निष्पन्न झालं, त्यामुळे मार्श आता पुन्हा ऑस्ट्रेलियाला रवाना होणार आहे.


ऑस्ट्रेलियाच्या आगामी वेस्ट इंडिज दौऱ्यापर्यंत मार्श फिट होईल, असा विश्वास ऑस्ट्रेलियन टीमच्या डॉक्टरांनी व्यक्त केला आहे. 


पिटरसन दुखापतग्रस्त झाल्यानंतर पुण्यानं ऑस्ट्रेलियाच्या उस्मान ख्वाजाला टीममध्ये घेतलं. फॅप डुप्लेसीस आणि आता मिचेल मार्शही दुखापतीमुळे बाहेर झाले आहेत. त्यामुळे पुण्याला आणखी दोन परदेशी खेळाडूंना टीममध्ये घ्यायची संधी आहे.