दुबई : पाकिस्तानविरुद्धची तिसरी आणि शेवटची टेस्ट वेस्ट इंडिजनं पाच विकेटनं जिंकली आहे. पण वेस्ट इंडिजच्या विजयापेक्षाही या मॅचमध्ये मोहम्मद आमीरच्या रन आऊटबद्दल सोशल नेटवर्किंगवर जोरदार चर्चा आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाहा मोहम्मद आमीरचा हास्यास्पद रन आऊट



बिशूच्या बॉलिंगवर आमीरनं लाँग ऑनवर मोठा शॉट मारला. या बॉलवर सिक्स मिळेल असा आमीरचा समज झाला, त्यामुळे तो धावला नाही. बाऊंड्री लाईनवर रस्टन चेजनं हा बॉल अडवला आणि बिशूकडे थ्रो केला. ही गोष्ट आमीरच्या उशीरा लक्षात आली आणि तो हास्यास्पदरित्या रन आऊट झाला.