नवी दिल्ली : टीम इंडियाचा माजी खेळाडू मोहम्मद कैफने एका पाकिस्तानी ट्रोलरची बोलतीच बंद केली आहे. कुलभूषण जाधव प्रकरणात आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निर्णयावर कैफने एक ट्विट करत आनंद व्यक्त केला होता. यानंतर एका पाकिस्तानच्या ट्विटर यूजरने कैफला घेरण्याचा प्रयत्न केला पण तो टिकू नाही शकला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुरुवारी न्यायालयाने कुलभूषण जाधवच्या फांशीवर स्थगिती आणली. त्यानंतर संपूर्ण देशात आनंदाचं वातावरण होतं. मोहम्मद कैफने देखील एक ट्विट करुन आनंद व्यक्त केला.


मोहम्मद कैफच्या या ट्विटवर एका पाकिस्तानत्या ट्विटर यूजरने म्हटलं की त्याने त्याच्या नावातून मोहम्मद हा शब्द काढून टाकावा. पण कैफने पण त्याला जशाच तसं उत्तर दिलं. त्याला त्याच्या नावावर गर्व असल्याचं त्याने म्हटलं. कैफने आमिर नावाच्या त्या व्यक्तीला एक धडा ही दिला. त्याने म्हटलं की 'आमिरचा अर्थ 'जीवनाने भरलेला असा होता. त्याची तुला गरज आहे.'


कैफने त्यानंतर म्हटलं की, 'कोणीही कोणत्याही धर्माचे ठेकेदार नाही आहेत. ठेकेदारांचं कोणत्याहा नावावर कॉपीराईट नाही आहे.' शेवटी कैफने म्हटलं की, 'भारत सर्व समावेशक आणि सहिष्णु देश आहे.'