अॅन्टिग्वा : भारताचा फास्ट बॉलर मोहम्मद शमीनं वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये चार विकेट्स घेतल्या. या चार विकेटबरोबरच शमीच्या आता टेस्ट क्रिकेटमध्ये त्याच्या 50 विकेट पूर्ण झाल्या आहेत. 


तेराव्या टेस्टमध्ये शमीनं त्याच्या 50 विकेट पूर्ण केल्या आहेत. यामुळे शमी सर्वात जलद 50 विकेट पूर्ण करणारा भारतीय बॉलर ठरला आहे. या आधी वेंकटेश प्रसादच्या नावावर हे रेकॉर्ड होतं. वेंकटेश प्रसादनंही 13 मॅचमध्येच 50 विकेटचा टप्पा गाठला होता.