टीम इंडियाला चीअर अप करण्यासाठी आला धोनी
शॉन मार्श आणि पीटर हँडस्कॉम्ब यांनी केलेल्या संयमी खेळीमुळे जोरावर ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीतील दुसऱ्या डावात चांगली धावसंख्या उभारली. त्यांच्या या खेळीमुळे कसोटी अनिर्णीत राहण्याच्या दिशेने आहे.
रांची : शॉन मार्श आणि पीटर हँडस्कॉम्ब यांनी केलेल्या संयमी खेळीमुळे जोरावर ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीतील दुसऱ्या डावात चांगली धावसंख्या उभारली. त्यांच्या या खेळीमुळे कसोटी अनिर्णीत राहण्याच्या दिशेने आहे.
दरम्यान, सामन्याच्या अखेरच्या दिवशी भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला संघाला चीअर अप करण्यासाठी आला होता. खुद्द बीसीसीआयने आपल्या सोशल मीडिया पेजवरुन ही माहिती दिली. तसेच धोनीचा फोटो शेअर करताना पाहा सामना पाहायला कोण आलय? असं म्हटलंय.
गेल्या काही दिवसांपासून विजय हजारे चषक स्पर्धा सुरु असल्याने धोनी सामना पाहण्यासाठी हजर राहू शकला नव्हता. मात्र शनिवारी सेमीफायनलमध्ये बंगालविरुद्ध झारखंडचा पराभव झाल्याने धोनीचा संघ स्पर्धेबाहेर झाला. त्यानंतर आज माही भारतीय संघाला चीअर अप करण्यासाठी मैदानात पोहोचला.