मुंबईची विजयी घोडदौड कायम, दिल्लीला चारली धूळ
यंदाच्या आयपीएलमधली मुंबई इंडियन्सची विजयी घोडदौड कायम आहे.
मुंबई : यंदाच्या आयपीएलमधली मुंबई इंडियन्सची विजयी घोडदौड कायम आहे. वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या मॅचमध्ये मुंबईनं दिल्लीचा १४ रन्सनी पराभव केला आहे. या मोसमातला मुंबईचा सलग सहावा विजय आहे.
१४३ रन्सचा पाठलाग करताना दिल्लीची सुरुवात अत्यंत खराब झाली. स्कोअरबोर्डवर फक्त २६ रन्स असताना दिल्लीचे ६ बॅट्समन पॅव्हेलियनमध्ये गेले होते. पण यानंतर क्रिस मॉरिस आणि रबाडानं दिल्लीला सावरलं. क्रिस मॉरिसनं ४१ बॉल्समध्ये ५२ रन्स आणि रबाडानं ३९ बॉल्समध्ये ४४ रन्स केल्या, तरीही दिल्लीचा पराभव झाला.
मुंबईकडून मॅकलेनघननं सर्वाधिक ३ विकेट घेतल्या तर बमुराहला दोन आणि हरभजननं एक विकेट घेतली. या मॅचमध्ये दिल्लीनं टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला आणि मुंबईला १४२ रन्सवर रोखलं. आयपीएलच्या पॉईंट्स टेबलमध्ये मुंबई पहिल्या क्रमांकावर कायम आहे. ६ मॅचमध्ये ५ विजयांमुळे मुंबईकडे आता १२ पॉईंट्स आहेत.