भोपाळ : सेल्फीची क्रेझ तरुणाईमध्ये मोठ्या प्रमाणात दिसते. हीच क्रेझ स्टीपलचेसची खेळाडू पुजा कुमारी हिच्या जीवावर बेतली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शनिवारी भोपाळमध्ये स्पोर्टस ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या कँपसमध्ये सेल्फी घेत असताना तिचा तोल गेल्याने फिश हार्वेस्टिंग प्लाँटमध्ये पडली. यावेळी तिचा बुडून मृत्यू झाला. 


पुजा कुमारी आपल्या सहकारी खेळाडूंसोबत कँपसमध्ये बनवण्यात आलेल्या फिश हार्वेस्टिंग प्लांटच्या येथे उभी राहून सेल्फी काढत होती. यावेळी तिचा तोल गेल्याने ती पाण्यात पडली. यात तिचा मृत्यू झाला.


पुजा कुमारीने गेल्या वर्षी नॅशनल चॅम्पियनशिप स्पर्धेतील २००० मीटर स्टीपलचेस प्रकारात रौप्यपदक मिळवले होते.