बँगलुरु : ऑस्ट्रेलियाचा ऑलराउंडर शेन वाटसन भारतचा युवा खेळाडू सरफराज खानच्या बॅटींगमुळे चांगलात प्रभावित झाला आहे. वॉटसन म्हणतो की, 'सरफराज एक चांगला बॅट्समन आहे आणि त्याचा स्वत:च्या शॉटवर चांगलं नियंत्रण आहे. त्याने त्यासाठी खूप अभ्यास आणि मेहनत केली असेल.'


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोमवारी झालेल्या सनराइजर्स हैदराबाद विरोधातील मॅचमध्ये सरफराजने १० बॉलमध्ये ५ फोर आणि २ सिक्स लगावत ३५ रन्स केले होते. त्यामुळे रॉयल चॅलेंजर्स बँगलुरुला २०० हून अधिक रन्स करणं शक्य झालं. 


वाटसनने एबी डिविलियर्सची ही प्रशंसा केली. ७ फोर आणि ६ सिक्सच्या मदतीने त्याने ८२ रनची जबरदस्त खेळी केली. क्रिस गेल, विराट आणि डिविलियर्सच्या बॅटींग ऑर्डरमध्ये कोणताही बदल करण्याची गरज नसल्याचं त्याने म्हटलं.