वेलिंग्टन : न्यूझीलंडचे माजी क्रिकेट कर्णधार मार्टिन क्रो याचं निधन झालंय. रक्ताच्या कर्करोगानं वयाच्या अवघ्या 53व्या वर्षी या झुंजार क्रिकेटपटूचा बळी घेतलाय. गेल्या काही वर्षांपासून ते कर्करोगानं ग्रस्त होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

२०१२ साली त्याच्यावर केमोथेरपी करण्यात आली आणि त्यानंतर ते पूर्ण बरे झाल्याचे जाहीर करण्यात आलं. मात्र सप्टेंबर २०१४मध्ये कॅन्सर परतल्याचं त्यांनी स्वतःच जाहीर केलं होतं. 


१३ वर्षांच्या क्रिकेट करिअरमध्ये मार्टिननं तब्बल १७ कसोटी शतकं ठोकलीते. ७७ टेस्टमध्ये ५ हजार ४४४ रन्स त्यांच्या नावावर आहेत. तर १४३ वन डे सामने ते खेळलेत. न्यूझीलंड संघाला वेगळी ओळख मिळवून देणारा कर्णधार हरपल्याची खंत क्रिकेट वर्तुळात व्यक्त होतेय.